चौघांमध्ये १ सरकारी, तर १ मदरशातील शिक्षक
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने १ सरकारी शिक्षक, १ मदरसा शिक्षक आणि अन्य २ जण यांच्या विरोधात २०० किलो गोमांस बाळगल्याच्या प्रकरणी असलेला गुन्हा रहित करण्यास नकार दिला आहे. या चौघांकडून मऊ जिल्ह्यामध्ये गोमांस आणि १६ गोवंश जप्त करण्यात आले होते. हे चौघेही मुसलमान आहेत. ते विना अनुज्ञप्ती पशूवधगृह चालवत होते. (अशांना सरकारी नोकरीत कसे घेतले जाते ? प्रशासनाचे याकडे लक्ष कसे नाही ? – संपादक)
Allahabad High Court refuses to quash proceedings against accused found in possession of beef and live cattle
report by @whattalawyer https://t.co/8JX3TA4bGD
— Bar & Bench (@barandbench) July 7, 2022
संपादकीय भूमिकाशिक्षक असतांना कायदाविरोधी कृत्य करणारे विद्यार्थ्यांवर काय संस्कार करत असतील, हे लक्षात येते ! |