गेल्या ६ मासांत बांगलादेशातील ७९ हिंदूंची हत्या ! – हिंदु महाजोत

हिंदु महिलांवर बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, हिंदूंचे पलायन !

हिंदु महाजोतचे पदाधिकारी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये ३० जूनपर्यंत ७९ हिंदूंची मुसलमानांकडून हत्या झाल्याची माहिती ‘बांगलादेश जातिया हिंदु महाजोत’ने (‘बांगलादेश नॅशनल हिंदु ग्रँड अलायन्स’ने) केला आहे. नसरुल हमीद सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदु महाजोतच्या वतीने ही माहिती देण्यात आली. या वेळी हिंदु महाजोतचे कार्याध्यक्ष दीनबंधू रॉय, उपाध्यक्ष प्रदीपकुमार पाल, मुख्य संयोजक विजय कृष्ण भट्टाचार्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

१. या संघटनेचे सरचिटणीस गोविंदा चंद्र प्रामाणिक यांनी दावा केला की, आणखी ६२० लोकांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, १४५ जणांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, १७३ घायाळ झाले आणि ३२ बेपत्ता आहेत. १ जानेवारी ते ३० जून २०२२ या कालावधीत हिंदूंच्या २६ कोटी २ लाख ३० सहस्र रुपयांच्या मालमत्तेची लुटमार करण्यात आली. यात १५७ कुटुंबे आणि मंदिरे यांचा समावेश आहे.

२. ‘ही माहिती कशाच्या आधारे प्रसिद्ध केली जात आहे’, असे विचारले असता गोविंदा चंद्र प्रामाणिक यांनी ‘बंगाली ट्रिब्युन’ दैनिकाच्या प्रतिनिधीला सांगितले की, ‘बांगलादेश नॅशनल हिंदु ग्रँड अलायन्स’चा स्वतःचा ‘रिसर्च सेल’ (संशोधन शाखा) आहे. देशभरात आमची समिती कार्यरत आहे; त्यांच्या माध्यमांतून ही माहिती मिळते. आम्ही देशभरातील माहिती प्रसिद्ध करत आहोत.

३. बांगलादेश जातिया हिंदु महाजोतने राष्ट्रीय संसदेत ७० आरक्षित जागांची मागणी केली आहे. तसेच हिंसा आणि अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र निवडणूक प्रणालीची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली. ‘लोकशाही अर्थपूर्ण करण्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला हवे, तसेच अल्पसंख्यांक मंत्रालयाचे हिंदूंसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे’, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

४. या पत्रकार परिषदेत पुढे सांगण्यात आले की, देशात प्रतिदिन कुठे ना कुठे हृदयद्रावक घटना घडत आहेत. छळामुळे अस्वस्थ झालेल्या हिंदूंची अवस्था दयनीय आहे. हिंदु शिक्षकांना शैक्षणिक संस्थांमधून हाकलून देण्याची रणनीती बनली आहे. देशात हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस आणि प्रशासन यांच्या उपस्थितीत हिंदु शिक्षकाच्या गळ्यात चपला बांधून त्यांचा छळ केला जात असल्याच्या घटना दिवसाढवळ्या घडत आहेत. ढाका, नारायणगंज, गोपालगंज, नरेल, सावर आदी ठिकाणी हिंदूंवरील अत्याचाराच्या एकामागून एक घटना न थांबता घडत आहेत.

बांगलादेशातील हिंदूंवरील विविध आक्रमणे

गोविंदा चंद्र प्रामाणिक यांच्या म्हणण्यानुसार,

१. यावर्षाच्या पहिल्या ६ मासांत हिंदूंच्या ४८ घरांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली, ३४३ घरांची जाळपोळ करण्यात आली, ९३ व्यवसायांवर आक्रमणे करण्यात आली, २ सहस्र १५९ एकर आणि ३६ टक्के भूमी नियंत्रणात घेण्यात आली.

२. १६ घरे जप्त करण्यात आली, तर २९ व्यावसायिक प्रतिष्ठान, २९ मंदिरांच्या भूमी नियंत्रणात घेण्यात आल्या असून १३२ घरांतून हिंदूंना हाकलून लावण्यात आले आहे. तसेच ६१८ कुटुंबांना घरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ६ सहस्र ९४३ कुटुंबांना हाकलण्याची धमकी देण्यात आली.

३. १५४ कुटुंबे कुटुंबांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे. ३ सहस्र ७९७ कुटुंबांना हद्दपारीची धमकी देण्यात आली आहे आणि १ लाख १५ सहस्र ४२९ कुटुंबे असुरक्षिततेत आहेत.

४. यावर्षी ५०१ संघटित आक्रमणे, ५६ मंदिरांवर आक्रमणे, तोडफोड आणि जाळपोळ, २१९ मूर्तींची तोडफोड, ५० मूर्तींची चोरी, ६ जणांचे अपहरण आणि १५ जणांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला.

५. १३ हिंदू महिलांवर बलात्कार, १० महिलांवर सामूहिक बलात्कार, बलात्कारानंतर  हत्येच्या ३ घटना, १९ बलात्काराचे प्रयत्न, ९५ धर्मांतराचे, २१ धर्मांतराचे प्रयत्न आणि ६३ प्रकरणांत धार्मिक भावना दुखावण्यात आल्या.

६. ९७ हिंदूंना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे आणि खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकण्यात आले आहे. ५६ धार्मिक संस्थांची विटंबना करण्यात आली आहे, ६० धार्मिक समारंभांमध्ये अडथळा आणण्यात आला आहे आणि १०० लोकांना गोमांस खायला घालण्यात आले आहे. एकूण ६३८ वेगवेगळ्या घटनांमध्ये १५२ कोटी ३५ लाख ५५ सहस्र रुपयांची हानी झाली.

गोविंदा चंद्र प्रामाणिक म्हणाले की, या घटनांच्या सातत्यावरून हे सिद्ध होते की, या देशातील हिंदूंचे जीवनमान दिवसेंदिवस कठीण होत आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • जगभरात कुठेही मुसलमानांच्या विरोधात अन्य धर्मियांकडून हिंसाचार झाला, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या, तर सर्वच इस्लामी देश संघटितपणे विरोध करतात; मात्र हिंदूंच्या संदर्भात हिंदूंकडून, त्यांच्या शासनकर्त्यांकडून कधी असे घडत नाही. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !