हर्ष हत्याकांडातील आरोपीला कारावासात विशेष सुविधा !

  • कर्नाटकमधील हिजाबबंदीचे प्रकरण

  • हर्ष यांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त

बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाबबंदीच्या प्रकरणावरून हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्याकांडातील आरोपीला बेंगळुरू शहरातील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात विशेष सुविधा मिळत असल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे आणि व्हिडिओ कॉल करत असल्याचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित झाले आहे. हे छायाचित्र समोर आल्यानंतर हर्ष यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी व्यवस्थेने आमचा विश्‍वासघात केला. कारागृहातील दोषी अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी हर्ष यांच्या कुटुंबियांनी केली.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा हर्ष हत्याकांडाचे अन्वेषण करत आहे. आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे.