कन्हैयालाल यांच्या हत्येला विरोध केल्यावरून वडोदरा (गुजरात) येथील भाजपच्या नेत्याला मुसलमानाकडून हत्येची धमकी

वडोदरा (गुजरात) – येथील भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सिंह जाधव यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी जाधव यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. जाधव यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर फेसबूकवर पोस्ट करून ‘अशी घटना तालिबानी अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये घडते. यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे इतरांना असे करण्याचे धाडस होणार नाही’, असे म्हटले होते.

१. जाधव यांनी पुढे असेही लिहिले आहे की, हत्या करणार्‍यांना हे ठाऊक होते की, या गुन्ह्यासाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा हाऊ शकते; मात्र या हत्येच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपये मिळाले असतील आणि ते सर्व कतार, कुवैत, सौदी अरेबिया या देशांतून आले असतील. त्यामुळे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपींचे वडील, आई, भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी आणि मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) यांनाही अटक करावी. जेणेकरून या पैशांचा ते उपयोग करू शकणार नाहीत. या सर्वांची संपत्तीही जप्त केली पाहिजे. हे सर्व जिहादी स्वर्गात अप्सरा मिळवण्यासाठी नाही, तर पैशांसाठी हत्या करतात.

२. या पोस्टवर अब्दुल सुबुर चौधरी याने अश्‍लाघ्य भाषेत उत्तर देत जाधव यांची अवस्था कन्हैयालाल यांच्यासारखी होईल, अशी धमकी दिली. याच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर हे खाते डिलीट (बंद) करण्यात आले.

संपादकीय भूमिका

देशात सर्वत्रच हिंदूंना अशा प्रकारच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. कट्टरतावादी मुसलमानांनी आता हिंदूंच्या विरोधात धर्मयुद्धच पुकारले आहे का ?, असे वाटू लागले आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून याच्या मुळापर्यंत जाऊन कठोर कारवाई केली पाहिजे !