गुरुबंधुत्वाचे नाते ।

कु. अदिती सुखठणकर

नाही हे रक्ताचे नाते ।
नाही हे ओळखीचे नाते ।।
आहे सर्वांत सक्षम असे नाते ।
हे केवळ गुरुबंधुत्वाचे नाते ।। १ ।।

जोडते हे नाते
साधकांना प्रेमपाशांनी ।
जे भरले आहे प्रेम,
त्याग आणि आदराने ।।
आहे हे नाते निरपेक्षतेचे ।
एकमेकांना साधनेत मदत करते हे अतूट नाते ।। २ ।।

ऐन वेळी हेच नाते येते साहाय्याला ।
सखे करतील त्याहूनही अधिक सर्वकाही ।।
कारण आहे या नात्यात ।
बीज साधना अन् साधकत्वाचे ।। ३ ।।

जे देखती गुरुरूप ।
प्रत्येक साधक आणि प्रसंगात ।।
म्हणून आहे हे नाते सुंदर आणि निरपेक्ष ।
आहे हे केवळ गुरुबंधुत्वाचे नाते ।। ४ ।।

– कु. अदिती सुखठणकर, केरळ (४.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक