१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी अनिष्ट शक्तींच्या त्रासाची तीव्रता न्यून होणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगापूर्वी मला होणार्या अनिष्ट शक्तींच्या त्रासाची तीव्रता अधिक होती. सत्संगाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे माझ्या त्रासाची तीव्रता न्यून झाली. मोठ्या अनिष्ट शक्तींचा माझ्यावरील प्रभाव अल्प होऊन मला स्वतःचे अस्तित्व जाणवले.
२. सत्संगानंतर ध्यानाची स्थिती अनुभवणे
गुरुदेवांचा सत्संग संपल्यानंतर माझे ध्यान लागून माझे मन निर्विचार स्थितीत गेले. या सत्संगाचा मला आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला. मला साधना आणि सेवा यांसाठी एक नवीन ऊर्जा मिळाली.
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |