उत्तम स्मरणशक्ती असून स्वावलंबी असलेला आणि देवाची आवड असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. अद्वैत प्रकाश खोंद्रे (वय ४ वर्षे) !

‘कोल्हापूर येथील चि. अद्वैत प्रकाश खोंद्रे (वय ४ वर्षे) याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘वर्ष २०१८ मध्ये ‘चि. अद्वैत प्रकाश खोंद्रे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ६२ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. अद्वैत खोंद्रे

१. सौ. मनीषा खोंद्रे (चि. अद्वैतची आई) 

सौ. मनीषा खोंद्रे

१ अ. उत्तम स्मरणशक्ती

१. ‘आम्ही एखाद्या ठिकाणाहून प्रवास केला असेल आणि नंतर कधीतरी त्याच मार्गावरून पुन्हा जात असू, तर अद्वैत मार्गातील सर्व खुणा सांगतो.

२. आमच्या घरी पितृपक्षात महालय श्राद्ध होते. तेव्हा तो विधी पूर्ण होईपर्यंत शांत राहून निरीक्षण करत होता. विधी झाल्यानंतर त्याने गुरुजींनी केलेल्या सर्व कृती सांगितल्या. नंतर तो ‘स्वाहा, स्वाहा’, असे म्हणत होता.

१ आ. स्वावलंबी असणे : त्याला स्वतःच्या कृती स्वतःच करायला आवडतात. अगदी लहान असल्यापासून तो स्वतःचे स्वतः आवरण्याचा प्रयत्न करतो.

१ इ. प्राण्यांविषयी पुष्कळ प्रेम असणे

१. त्याला प्राण्यांची पुष्कळ आवडत आहे. एकदा आम्ही माझ्या जाऊबाईंकडे गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे पायर्‍यांवर एक चिमणी तडफडत होती. हे पाहून अद्वैतने तिला लगेच पाणी पाजले.

२. एकदा माझ्या माहेरी एक चिमणी मृत होऊन पडली होती. तेव्हा त्याने लगेच तिला स्वतः खड्डा करून पुरले आणि ‘ती चिमणी देवबाप्पाकडे गेली’, असे तो सांगू लागला.

१ ई. काही वेळा तो बोलत असतांना ‘त्याचे बोलणे ऐकतच रहावे आणि त्याच्याकडे पहातच रहावे’, असे वाटते अन् त्यातून पुष्कळ आनंद मिळतो.

१ उ. तो रात्री झोपला असतांना ‘ध्यानावस्थेत आहे’, असे वाटते.

१ ऊ. देवाची आवड

१. तो नियमित गळ्यात देवतेचे पदक घालतो. कधी मी विसरले, तर लगेच मला आठवण करून देतो आणि मला सांगतो, ‘‘देवतेचे पदक घातल्यामुळे आपले रक्षण होते.’’

२. तो सकाळी उठल्यावर प्रथम सूर्याला नमस्कार करतो आणि त्याच्या वडिलांच्या समवेत अग्निहोत्र करतो. तेव्हा तो मंत्र सहजतेने म्हणतो.

३. अद्वैत त्याच्या काकांसह चारचाकी गाडीतून जातांना त्यांनी चित्रपटातील गाणी लावली असतील, तर तो त्यांना देवाची गाणी लावायला सांगतो.

४. त्याच्या मामाने त्याच्या चारचाकी गाडीच्या मागे स्वामी समर्थांचे चित्र लावले आहे. ते पाहून तो आम्हाला म्हणाला, ‘‘आपणही मामासारखे आपल्या गाडीच्या मागे प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र लावूया.’’ खरेतर त्याला प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी फार काही ठाऊक नाही. त्यानंतर त्याने आम्हाला भेट मिळालेली श्री महालक्ष्मीची लहान मूर्ती गाडीत ठेवली.

१ ए. आध्यात्मिक उपायांचे महत्त्व : तो ३ वर्षांचा असल्यापासून खोलीची शुद्धी करणे, रात्री झोपतांना नामपट्टीचे मंडल करणे, या गोष्टी करण्यासाठी मला साहाय्य करतो. एकदा त्याने मला ‘कोणती नामपट्टी कोणत्या दिशेला ठेवायची ?’, हे विचारून घेतले. तेव्हापासून तो झोपतांना स्वतःभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालतो. पूर्वी तो अत्तर आणि कापूर यांचे उपाय करत नव्हता, आता तो स्वतःहून उपाय करतो.

१ ऐ. चुकांविषयी गांभीर्य

१. त्याच्याकडून चूक झाली की, तो ती लगेच स्वतःहून सांगतो. एकदा चुकून त्याचा पाय देवतेच्या चित्राला लागला, तेव्हा त्याने लगेच नमस्कार करून क्षमायाचना केली.

२. खेळतांना त्याचे मित्र काही चुकीचे वागले, तर तो लगेच त्यांना ‘हे वागणे चुकीचे आहे’, असे सांगतो.

१ ओ. अद्वैतमध्ये जाणवलेले पालट

१ ओ १. पूर्वी खेळतांना त्याच्या मनासारखे झाले नाही की, अद्वैतची चिडचिड होत असे. आता त्याच्यामध्ये सकारात्मक पालट झाला आहे.

१ ओ २. खेळतांना सात्त्विक लघुग्रंथांचे दुकान मांडणे आणि प्रत्येक ग्रंथाची सुस्पष्टपणे माहिती सांगणे : तो खेळतांना सात्त्विक लघुग्रंथांचे दुकान मांडतो. तो आम्हाला प्रत्येक ग्रंथाची सुस्पष्टपणे माहिती सांगतो आणि आम्हाला ते विकत घेण्यास सांगतो. प्रत्यक्षात आम्ही त्याला ग्रंथांविषयी फार काही सांगितलेले नाही. ग्रंथांची माहिती सांगून झाल्यावर तो आम्हाला ‘इतरांना ग्रंथांविषयी सांगा आणि तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या मित्रांना हे ग्रंथ भेट द्या’, असे आवर्जून सांगतो.

१ ओ ३. पूर्वी मी भ्रमणभाषवर सेवेविषयी बोलत असतांना तो पुष्कळ रडत असे. आता तो स्वतःहून मला सांगतो, ‘‘आई, तू सेवा कर आणि आढावा दे. तोपर्यंत मी खेळतो.’’ त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

श्री. प्रकाश खोंद्रे

१ अं. संतांनी अद्वैतच्या डोक्यावर हात ठेवून पुष्कळ वेळ मंत्रांचे उच्चारण करणे आणि प्रसाद देणे : एकदा आम्ही एका संतांच्या दर्शनाला गेलो होतो. ते ध्यानमार्गाने साधना करतात. त्यांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी अद्वैतच्या डोक्यावर हात ठेवून पुष्कळ वेळ मंत्रांचे उच्चारण केले. त्या वेळी अद्वैत अगदी शांत राहिला होता. एरव्ही तो एवढा वेळ शांत रहात नाही. त्यानंतर त्या संतांनी त्याला प्रसाद दिला. तेव्हा त्याला पुष्कळ आनंद झाला.’

२. श्री. प्रकाश खोंद्रे (चि. अद्वैतचे बाबा)

२ अ. सूक्ष्मातील कळणे : ‘एकदा मी गावी जात होतो. तेव्हा तो मला ‘बाबा, लवकर जा’, असे सांगून रडत होता. मला जाण्यास विलंब होत असल्याने तो अधिकच रडायला लागला. नंतर तो रडायचा थांबला. त्यानंतर मी प्रवासाला गेल्यावर माझ्या

श्री. राजाराम खोंद्रे

गाडीला अपघात झाला. तेव्हा मला तो ‘लवकर जा’, असे सांगण्याचे कारण माझ्या लक्षात आले.

२ आ. देवाविषयी भाव

अ. अद्वैत ३ वर्षे ५ मासांचा असतांना त्याने त्याच्या चुलत भावासह पुठ्याचे मंदिर बनवले होते. तो जेवणाआधी किंवा खेळण्याआधी त्या मंदिराजवळ जाऊन नमस्कार करून येत असे.

आ. तो दिवसातून एकदा कुलदेवाचा जयघोष करतो.

इ. तो खेळत असतांना मध्येच जाऊन घरातील प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीकृष्ण सरस्वती महाराज (कोल्हापुरातील

सौ. सुशीला खोंद्रे

संत) यांना नमस्कार करून येतो.’

३. श्री. राजाराम खोंद्रे आणि सौ. सुशीला खोंद्रे, (आजी-आजोबा,

अद्वैतच्या बाबांचे आई-वडील)  

अ. ‘त्याचे आमच्या मूळ गावी सारखे जाणे होत नाही; पण तो नेहमी मूळ गावाचे नाव घेतो आणि आमच्या ग्रामदेवाच्या नावाचा जयघोष करतो.

आ. तो घरी नसतांना घरात नकारात्मकता जाणवते आणि तो गावावरून घरी परत आला की, सर्व सकारात्मक वाटू लागते.’

४. श्रीमती इंदुबाई खोमणे (चि. अद्वैतची आजी, अद्वैतच्या आईची

श्रीमती इंदुबाई खोमणे

आई) 

‘अद्वैतशी सतत बोलावे, त्याला जवळ घ्यावे आणि त्याचे प्रगल्भ अन् गोड बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते.’

५. सौ. स्वाती पाटील (अद्वैतची मावशी)

५ अ. दुसर्‍यांना आनंद देणे

१. ‘अद्वैत आमच्या घरी आल्यावर मला प्रेमाने विचारतो, ‘‘तू कशी आहेस..? आनंदी आहेस ना..?’’ तेव्हा तो इतका गोड हसतो की, ‘तो हसण्यातून चैतन्याची मुक्त उधळण करत आहे’, असे मला वाटते.

सौ. स्वाती पाटील

२. अद्वैत घरी आल्यावर वातावरणातील दाब न्यून होऊन नष्ट होतो आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदी होऊन त्याच्याशी खेळू लागतो.

५ आ. अनुभूती – अद्वैतशी बोलल्याने अनिष्ट शक्तींचे आवरण दूर होऊन हलके वाटणे : मी कित्येकदा असे अनुभवले आहे की, मी नैराश्यात असल्याने देवाला आळवत असतांना अद्वैतच्या आईचा भ्रमणभाष येतो. त्या वेळी अद्वैतच माझ्याशी पुष्कळ वेळ बोलतो. ‘मला गोष्ट सांग’, असे म्हणतो आणि त्या कालावधीत माझ्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण जाऊन मला हलके वाटते आणि माझा आतून नामजप होऊ लागतो.

५ इ. अद्वैत आमच्याकडे नसतांना त्याची आठवण काढून त्याच्या बाललीलांविषयी बोलत असतांना वातावरणातील दाब न्यून होऊन आनंदाच्या लहरी पसरत असल्याचे लक्षात येते.’

६. अनुभूती : ‘हे टंकलेखन करतांना प्रत्येक वाक्यागणिक मला पुष्कळ आनंद होत होता आणि माझा उत्साहही वाढत होता.’ – सौ. अनिता अरुण करमळकर, कोल्हापूर (१४.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक