हिंदुद्वेष्ट्या महंमद जुबेर याच्या समर्थनार्थ ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’कडून निवेदन !

‘अल्ट न्यूज’चा सह संस्थापक महंमद जुबेर

नवी देहली – हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला ‘अल्ट न्यूज’चा सह संस्थापक महंमद जुबेर याच्या समर्थनार्थ संपादकांची संघटना असलेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ पुढे सरसावली आहे. त्यांनी प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, ‘वर्ष २०१८ मध्ये प्रसारित झालेल्या ट्वीटवर आता, म्हणजे २०२२ मध्ये कारवाई करण्यात आली आहे. देहली पोलिसांनी जुबेर याची तात्काळ सुटका करावी.’

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍याचे समर्थन करणार्‍यांवर हिंदु संपादकांनी बहिष्कार घातला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
  • ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’कधी अन्याय झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संपादकांच्या पाठीशी उभी राहिली आहे का ?