मुसलमान आतंकवाद्यांनी भारतात केलेल्या बाँबस्फोटांचा इस्लामी देशांनी निषेध केला होता का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

संकट मोचन मंदिर उडवण्यासाठी मुसलमान आतंकवाद्यांनी बाँब पेरले होते

नवी देहली – इस्लामी देशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ८ मार्च २००६ या दिवशी अयोध्येतील संकट मोचन मंदिर उडवण्यासाठी मुसलमान आतंकवाद्यांनी बाँब पेरले होते. या बाँबस्फोटांत १४ पुजारी ठार झाले होते, तर १०० पेक्षा अधिक भक्त घायाळ झाले होते. नूपुर शर्मा प्रकरणी भारताचा निषेध करणार्‍या इस्लामी देशांनी त्यावेळी त्या घटनेचा निषेध केला होता का ?

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता, असे ट्वीट करून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी इस्लामी देशांना प्रश्‍न विचारला आहे.