वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांकडून अभिष्टचिंतन

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिष्टचिंतन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ‘हिंदुत्वाचा झंझावात’ अशी ओळख निर्माण झालेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेश राज्याने विकासाची नवी शिखरे सर केली आहेत.


योगी आदित्यनाथ यांचा परिचय

योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ या दिवशी उत्तराखंड राज्यातील एका गावात झाला. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून वर्ष १९९८ पासून सलग ५ वेळा निवडून आले. अयोध्येतील श्रीराममंदिर आंदोलनासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. गोरखपूर मठाचे महंत अवैद्यनाथ यांचे ते शिष्य होत. योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मठाचे मुख्य पुजारीही आहेत.