इम्रान विवाहित असल्याचे आशाला कळल्याने केले आक्रमण !

बदायूं (उत्तरप्रदेश) – येथील इम्रान नावाच्या एका मुसलमान युवकाने आशा नावाच्या त्याच्या हिंदु प्रेयसीला गोळी मारल्याची घटना घडली. या आक्रमणात आशा घायाळ झाली. आक्रमणामागे आशाला ‘इम्रान हा पूर्वीपासून विवाहित असल्याचे कळले’, असे कारण सांगितले जात आहे. या आक्रमणात इम्रानचा मित्र झिशानही सहभागी झाला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
उत्तर प्रदेश के बदायूं जिले में एक युवक ने अपनी पोल खुलने के बाद प्रेमिका को गोली मार दी और मौके से फरार हो गया #CrimeNewshttps://t.co/t7bjDzjZtc
— AajTak (@aajtak) June 2, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही मूळची अमेठी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती तिच्या कुटुंबियांसमवेत हरियाणातील गुरुग्राममध्ये रहाते. ती लोकांच्या घरी जेवण बनवण्याचे काम करते. गुरुग्राम येथेच इम्रान केशकर्तनाचे काम करतो. दोघे एकदा भेटले. पुढे इम्रानने आशाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कालांतराने ती इम्रानला विवाह करण्याविषयी विचारू लागली. इम्रान मात्र टाळत राहिला. पुढे आशाला तो विवाहित असल्याचे कळाले. एके दिवशी इम्रान तिला बदायूं येथे घेऊन आला. तेथे त्याने त्याचा मित्र झिशान याच्या साहाय्याने तिला मारहाण केली. घटनास्थळावरून पळून जात असतांना त्याने तिच्यावर गोळीबार केला. त्यात ती घायाळ झाली; परंतु त्याही स्थितीत ती पळतच राहिली. काही अंतरावर एका मंदिरापाशी पोचून ती बेशुद्ध पडली. स्थानिकांच्या साहाय्याने रुग्णालयात तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आक्रमणकर्त्यांना अटक केली असून आशाला तिच्या घरी पोचवले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु युवतींनो, ‘लव्ह जिहाद’पासून सावधान ! अशा मुसलमानी षड्यंत्रापासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन साधना करा आणि आत्मबळ वाढवा, तसेच स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घ्या ! |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !