पुणे – नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणार्यांचा संबंध आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या करणार्यांशी आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते २४ मे या दिवशी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोमय्या पुढे म्हणाले की, हेमंत करकरे यांची हत्या २ कारणांनी झाली. ही हत्या कसाबच्या सहकार्यांनी, पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी केली; मात्र हेमंत करकरे यांचा मृत्यू ‘बुलेट प्रुफ जॅकेट’ नकली असल्याने झाला. ज्या विमल अग्रवालला ‘बोगस बुलेटप्रुफ जॅकेट’ प्रकरणी अटक झाली, त्याचे नाव यशवंत जाधव वर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आले होते. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ आहेत.