३० वर्षांत ६० हून अधिक विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या माकपच्या नगरसेवकाला अटक

माकपचा नगरसेवक शशीकुमार

मल्लपूरम् (केरळ) – गेल्या ३० वर्षांत ६० हून अधिक विद्यार्थिंनींची छेड काढल्याच्या प्रकरणी माजी शिक्षक आणि माकपचा नगरसेवक शशीकुमार यास अटक करण्यात आली. यानंतर माकपने शशीकुमार याला पक्षातून निलंबित केले आहे. शशीकुमार याच्याविरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

शशीकुमार हा ‘सेंट गेमास गर्ल्स हायर सेकेंडरी विद्यालय’ या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने फेसबूकद्वारे शशीकुमार याने तिच्याशी केलेल्या छेडछाडीविषयी माहिती उघड केली. त्यानंतर अन्य विद्यार्थिनींनीही त्यांच्यासंदर्भात घडलेले छेडछाडीचे प्रकार सांगितले. या प्रकरणी केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी चौकशीचा आदेश दिला होता. त्यानंतर शशीकुमार पसार झाला. एक आठवड्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याने नगरसेवक पदाचे त्यागपत्र दिले आहे.

संपादकीय भूमिका

३० वर्षांत एकाही विद्यार्थिनीला याविषयी तक्रार करण्याचे धाडस होऊ शकले नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !