
नागपूर – अंगारे-धुपारे देऊन पूजा करण्याच्या नावाखाली येथे १७ वर्षांच्या मुलीवर ३ मे या दिवशी सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी दोघा भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केलीे. मनोहर कोल्हे आणि युवराज सोनटक्के अशी त्यांची नावे आहेत.
१. पीडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला वरील दोघांकडे नेले. या वेळी मुलीचा मामाही समवेत होता.
२. तेथे मनोहर कोल्हे अंगारे-धुपारे देऊन अनेक मुलींची पूजा करत होता. त्याने ‘मुलीवर देवाची अवकृपा झाल्याने तिची रात्रभर पूजा करावी लागेल’, असे सांगितले.
३. रात्री ९.३० वाजता मनोहर कोल्हे याने मुलीला घरात नेले. त्या वेळी पुजारी युवराज हाही घरात घुसला. दोघेही मुलीवर बलात्कार करत असतांना तिच्या मामाने हा प्रकार पाहिला. मामांना पाहून दोघेही पळून गेले.
४. मामाने सावनेर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या दोघा भोंदूबाबांनी आतापर्यंत अनेक अल्पवयीन मुलींची पूजा करण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
नागपूर : दोन भोंदू बाबांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://t.co/qbJ13uwIFH
— Manoj Salve (@ManojSalve1000) May 4, 2022
संपादकीय भूमिकासमाजात ९८ टक्के संत भोंदू आहेत. धर्मशिक्षणाअभावी भोंदू लोक ओळखता येत नसल्याने अनेक हिंदू त्यात फसतात आणि अनेकांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. यातील दोषींना शिक्षा झाली पाहिज. यासह खरे संत ओळखता येण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे ! |
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !