देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे अभूतपूर्व योगदान !
नवी देहली – महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील लोकांनी विविध क्षेत्रांत त्यांचेे कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील ट्वीट करून महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांंसारख्या महान महापुरुषांनी महाराष्ट्र आणि भारत यांसाठी योगदान देत ते समृद्ध केले आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे आहे.’ यासह केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
Best wishes to the people of Maharashtra on Maharashtra Day. This state has made phenomenal contributions to national progress. The people of the state have excelled in diverse fields. I pray for the prosperity of the people of Maharashtra.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2022