अलवर (राजस्थान) येथील शिवमंदिर पाडण्याच्या प्रकरणी ३ अधिकारी निलंबित  

अलवर (राजस्थान) – येथील राजगडमध्ये ३०० वर्षे जुने असलेले शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे अनधिकृत ठरवून पाडल्याच्या प्रकरणी सरकारने राजगडचे प्रशासकीय अधिकारी केशव मीणा यांना निलंबित केले आहे. तसेच नगरपालिकेचे अधिकारी बनवारीलाल मीणा आणि नगरपालिका आयुक्त सतीश दुहरिया यांनाही निलंबित केले आहे.