हिंदु आतंकवादाच्या खोटारडेपणाला विरोध करून हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य !

हिंदु धर्माला नीच ठरवू पहाणाऱ्यांना हिंदूंनी सतर्क राहून आणि परंपरांना टिकवून धर्माचरणाद्वारे तोंड देणे आवश्यक ! – संपादक

वर्ष २००८ च्या शरद ऋतूतील माझ्या वेदना आजही ताज्या आहेत. काही वर्षांपूर्वीपासून मी राजकारण जवळून जाणून घेणे चालू केले होते. त्यासाठी मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची वर्गणीदारही झाले होते. त्या कालावधीत भारताच्या विविध शहरांमध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले होते. या बॉम्बस्फोटांतील संशयित गुन्हेगार इस्लामी संघटनांशी संबंधित होते. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनीही जिहादी आतंकवाद्यांकडे अंगुलीनिर्देश केला होता. वर्ष २००८ मध्ये धक्कादायक असे ‘हिंदु आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’चे मथळे वृत्तपत्रांतून झळकू लागले. राजकारणी आणि पत्रकार या शब्दांचा सहज वापर करतांना दिसू लागले. त्यांनी कधी ‘इस्लामी आतंकवाद’ किंवा ‘हिरवा आतंकवाद’ असा शब्दप्रयोग केल्याचे ऐकिवात नव्हते. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, स्वामी असीमानंद यांच्यासह अनेक हिंदूंना अटक झाली.

मारिया वर्थ

१. धर्म सामान्यांची नाहक हत्या करण्यास अनुमती देत नाही !

‘हिंदु आतंकवाद’ असे काहीच अस्तित्वात नाही, याविषयी मला पूर्ण निश्चिती होती. हिंदु आतंकवाद असूच शकत नाही; कारण हिंदु समाज हा धर्मावर आधारलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे आचरण योग्य ठेवणे म्हणजे धर्म होय ! या ठिकाणी प्रत्येकाची सद्सद्विवेकबुद्धी त्याची मार्गदर्शक असते. यामध्ये एखाद्याला जेव्हा योग्य काय, हे समजत नाही, तेव्हा तो गुरु किंवा धर्मग्रंथ यांचा आधार घेतो.

एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, सामान्य लोकांची रेल्वेस्थानक, बाजारपेठ किंवा उपाहारगृह यांमध्ये हत्या करणे कदापि योग्य ठरत नाही. योग्य विचारसरणी असलेली व्यक्ती कधीही असे कर्म करणार नाही. धर्म अशा गोष्टींना अनुमती देत नाही. एखाद्या क्रूर सत्ताधिशाला ठार मारण्याची अनुमती एक वेळ धर्म देऊ शकतो. ब्रिटीश राजवटीत सरदार उधम सिंह यांनी लेफ्टनंट गव्हर्नर डायरची केलेली हत्या समर्थनीय होती; कारण लेफ्टनंट गव्हर्नर डायरने वर्ष १९१९ मध्ये जालियानवाला बाग हत्याकांड घडवले होते आणि त्यामध्ये सहस्रो निष्पाप भारतियांना गोळ्या घालून ठार मारले होते. शांतपणे जीवन जगणाऱ्या अज्ञात लोकांची हत्या करणे, हे मानवाच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या विरोधात आहे. हिंदु धर्माचा कणा असलेल्या धर्माच्या ते विरोधात आहे.

२. काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या दबावानंतर अन्वेषणाची दिशा पालटली !

हिंदु आतंकवादाचे चित्र कुठून निर्माण झाले ? हे चित्र बलपूर्वक उभे केले गेले आणि ज्यांनी हे केले, त्यांना आपण दुष्कृत्य करत असल्याचे ठाऊक होते. यासारखा आणखी दुष्ट कट असूच शकत नाही. वर्ष २००६ ते वर्ष २०१० या कालावधीत गृहमंत्रालयामध्ये कार्यरत असलेले आर्.व्ही.एस्. मणि यांनी त्यांच्या ‘हिंदु टेरर’ या पुस्तकामध्ये खोट्या हिंदु आतंकवादाविषयी लिहिले आहे. त्या वेळचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी तेथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि मुंबईतील आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे उपस्थित होते. त्यांनी त्या कालावधीत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या अन्वेषणाविषयी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्या बाँबस्फोटांमध्ये इस्लामी आतंकवादी संघटना सहभागी असल्याच्या श्री. मणि यांच्या निष्कर्षाविषयी त्यांनी नापसंती व्यक्त केली. त्यांना तो निष्कर्ष मान्य नव्हता. त्यानंतर मालेगांव, हैदराबाद आणि समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटांविषयीचे चित्रच पालटले. अन्वेषणाची दिशाच पालटण्यात आली. या प्रकरणी हिंदूंना आरोपी ठरवण्यात आले आणि धर्मांध आरोपींना ते या बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे सापडले असतांनाही निर्दाेष ठरवून सोडून देण्यात आले.

यामागे कारण काय असू शकते ? आतंकवादामुळे पाकिस्तान आणि इस्लाम यांविषयी निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा सौम्य करणे अन् त्यामध्ये समतोल निर्माण करणे, हे एक कारण असल्याचे गृहीत धरले जाते. हिंदु धर्म आणि भारत अगदीच वाईट नसला, तरी थोडाफार त्रासदायक आहे, असे चित्र निर्माण करण्याचे ते षड्यंत्र होते अन् त्यांचा हा कुटील डाव यशस्वीही झाला होता.

३. इस्लामी आक्रमणाचे पुरावे हातात असूनही ‘२६/११ : आरएस्एस् की साजिश’ नावाचेपुस्तक दिग्विजय सिंह यांच्या हस्ते प्रकाशित !

मुंबईतील ताज हॉटेलवरील आक्रमण हिंदूंनी केल्याचा आरोप केला जात होता. नेहमीप्रमाणे इस्लाम आणि आतंकवाद यांचा संबंध नाकारण्यात येत होता. त्यामुळे इस्लामी आतंकवादी आक्रमणाचे दुष्कृत्य झाकले जाऊ शकले असते. त्या दृष्टीने हे षड्यंत्र रचणाऱ्यांचा डाव यशस्वी होतांना दिसत होता. वर्ष २००८ मधील २६/११ चे आक्रमण चालू असतांनाच हिंदु संघटनांवर त्याचे खापर फोडण्याचे प्रयत्न चालू झाले होते. मी जेव्हा या षड्यंत्राविषयीचे वृत्त पाहिले, तेव्हा मला पुष्कळ दु:ख झाले. त्याच वेळी सुदैवाने तुकाराम ओंबळे नावाच्या पोलीस शिपायाने स्वत:चा जीव धोक्यात घालून एका आतंकवाद्याला जिवंत पकडल्याचे वृत्त वाचले. या आक्रमणातील एखाद्या आतंकवाद्याला जिवंत पकडता येण्याची शक्यता शून्य होती; परंतु सुदैवाने एक आतंकवादी जिवंत हाती लागला होता. त्याचे नाव कसाब असे होते आणि तो पाकिस्तानातील धर्मांध होता. त्याने स्वत:ला हिंदु असल्याचे दर्शवण्यासाठी गुळगुळीत दाढी केली होती आणि हाताला धागा बांधला होता. तरीही या आतंकवादी आक्रमणाचा संबंध हिंदु धर्माशी जोडण्याचा प्रयत्न चालूच होता. डिसेंबर २०१० मध्ये सर्व पुरावे विरोधात असतांनाही ‘२६/११ – आरएस्एस् की साजिश’ नावाचे पुस्तक काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

४. धर्माच्या नावाने दिली जाणारी समाजविघातक शिकवण

देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांना पुढे केले जात होते, त्या राहुल गांधी यांनी ‘हिंदु आतंकवादा’चे तुणतुणे पुढे चालू ठेवले होते. त्यांनी अमेरिकेचे राजदूत तिमोथी रोमर यांना सांगितले की, ‘इस्लामी आतंकवाद्यांपेक्षा हिंदु आतंकवाद्यांपासून भारताला अधिक धोका आहे’, ‘सर्व धर्मांमध्ये आतंकवादी आहेत’, असा प्रचार त्यांनी चालू ठेवला. त्यात तथ्य असल्याची भावना निर्माण होऊ लागली; परंतु आतंकवादी कारवाया करण्यामागे एक उद्देश दडलेला असतो. इस्लाममध्ये आतंकवादाचा पुरस्कार केल्याचे दिसून येते; कारण कुराणमध्ये मानवांची ‘इस्लाम मानणारे आणि इस्लाम न मानणारे (काफीर)’ अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अल्लाच्या नावाने काफिरांच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रेरित केले जाते. कुराणच्या २.२१६ व्या आयतामध्ये सांगितले आहे की, ‘तुला योग्य वाटत नसेल, तरीही लढा देणे तुझ्यासाठी विहित आहे. या तत्त्वाचा अवलंब केलाच पाहिजे, हा लढा देणे म्हणजे नेमके काय ? इस्लामी जग निर्माण करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे. संपूर्ण जगात इस्लामची स्थापना करणे; कारण इतर सर्व धर्म खोटे आहेत, अशी शिकवण यामध्ये अंतर्भूत आहे.

अल्ला काफिरांचा तिरस्कार करतो. तो त्यांना नरकात पाठवतो. काफीर हे जगातील सर्वांत निकृष्ट दर्जाचे प्राणी असून त्यांना अजिबात दयामाया दाखवत नाही. त्यामुळे काफिरांना ठार मारल्याने किंवा त्यांच्या महिलांवर बलात्कार केल्याने पाप लागत नाही. धर्माच्या नावाने ही शिकवण दिली जाते आणि धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली त्याला सुरक्षाही पुरवली जाते. शाळांतून ही शिकवण दिली जाते. मुल्लामौलवी उघडपणे त्याचा प्रसार करतात. ‘या शिकवणीचा अवलंब करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्त होतो’, असे सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक यावर विश्वास ठेवतात.

५. धर्मांतरितांचे भवितव्य धोकादायक !

धर्मांधांना लहानपणापासून तशी शिकवण दिली जाते. त्यामुळे ते तसे वागतात, हे आपण समजू शकतो; परंतु खलिद मसूद (पूर्वाश्रमीचे एड्रियन एल्म्स) याच्यासारखे धर्मांतरित धर्मांधही अल्लाच्या नावाने हत्या घडवून आणत आहेत. जे खरे ख्रिस्ती आणि खरे मुसलमान नाहीत, त्यांच्यासाठी भविष्य अत्यंत भयानक असल्याचे भाकीत अनुक्रमे चर्च आणि इस्लाम करत आहेत. ‘काफिरांना ठार मारल्याने तुम्हाला स्वर्गाची निश्चित प्राप्ती होईल’, असे या गुन्हेगारांच्या मनावर बिंबवले जाते. ‘निरपराध लोकांना ठार मारल्याने त्यांना स्वर्ग मिळणार नाही’, हे निश्चित; परंतु कुणीही त्यांना त्याविषयी सांगत नाही. उलट शिक्षित आणि व्यावसायिक मुसलमान त्यांच्या मनामध्ये संशयाचे बीज रुजवण्याचे काम करतात.

स्वत:च्या उज्ज्वल भविष्यासाठी काफिरांची हत्या करण्याची शिकवण इस्लाम देतो. ख्रिस्ती धर्मामध्येही ख्रिस्ती नसलेल्या लाखो लोकांची हत्या करण्यात आली आहे. साम्यवाद आणि नाझीवाद यांनीही त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या लाखो लोकांची हत्या केली आहे. इस्लाम आणि ख्रिस्ती यांमध्ये फरक एवढाच आहे की, ख्रिस्ती ‘देवाला पाहिजे; म्हणून इतरांची हत्या करतो’, असा दावा करत नाहीत.

६. हिंदु धर्म विश्वबंधुत्वाची शिकवण देतो !

हिंदु धर्म मात्र पूर्णपणे वेगळा आणि परोपकारी धर्म आहे. ब्रह्म हे या विश्वाचे मूळ असून ते सर्वांमध्ये सामावले आहे. ते सर्वव्यापी आहे. ते आत्मस्वरूप असल्याने त्याला मानणारे आणि न मानणारे असा भेद ते करत नाहीत. आत्मा सर्वांमध्ये आहे आणि सर्वांना जगण्याचा हक्क आहे. हिंदु धर्म विश्वबंधुत्वाची शिकवण देतो. आपल्या गटापुरती मर्यादित बंधुत्वाची शिकवण देत नाही.

या जगात असेही लोक आहेत, जे हिंदु नावे धारण करतात; परंतु धर्माप्रमाणे वागत नाहीत आणि स्वार्थ, वासना किंवा सूडभावनेपोटी गुन्हे करतात. त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. हिंदु धर्माच्या नावाने सामान्य लोकांमध्ये आतंकवाद निर्माण करणे शक्य नााही. काँग्रेसच्या काही राजकारण्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘हिंदु आतंकवादा’विषयी रचलेला कट म्हणजे एक अत्यंत भयावह आणि विश्वासघातकी षड्यंत्र आहे.

भारत देश तुकाराम ओंबळे यांच्याविषयी कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळे वर्ष २००८ मध्ये हिंदूंच्या विरोधातील एक मोठे षड्यंत्र टळले; परंतु त्यापासूनचा धोका अजून संपलेला नाही. हिंदु धर्माला नीच ठरवू पहाणाऱ्या शक्ती अद्याप सक्रीय आहेत. हिंदूंनी सतर्क राहिले पाहिजे आणि त्यांनी त्यांची संस्कृती अन् परंपरा टिकवली पाहिजे, तसेच धर्माचरणाचा मार्ग अवलंबला पाहिजे.

७. हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे मानवतेप्रतीचे आपले कर्तव्य !

हिंदु धर्म एका मोठ्या लाटेप्रमाणे होणे आवश्यक आहे, जो सर्व जगाला झटकून टाकेल आणि सर्व लोकांना सत्च्या जवळ आणू शकेल. सत्य पुस्तकांमध्ये नाही. हिंदु धर्म सत्वर आधारलेला असल्याने त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. आपण कोण आहोत, हे ओळखणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे आणि तोच खरा आनंद आहे.

दुराग्रही आणि कट्टरतावादी पंथांना ठाऊक आहे की, त्यांना संपवण्याची शक्ती हिंदु धर्मामध्ये आहे. या पंथियांना जेव्हा त्यांच्या दाव्यातील फोलपणा लक्षात येईल, तेव्हा त्या पंथांचा प्रभाव क्षीण होईल. अलीकडे पाश्चात्त्य देशांमध्ये ख्रिस्ती पंथाचा प्रभाव अल्प झालेला आहे. सर्वांनी हिंदु धर्माचा अवलंब केला पाहिजे. तेच या भूमीवरील प्राचीन ऋषी-मुनींप्रती आपले कर्तव्य आहे आणि व्यापक अर्थाने मानवतेप्रतीही आपले कर्तव्य आहे.’

– मारिया वर्थ, जर्मन लेखिका.