१ एप्रिलपासून कामावर न आलेल्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई – आतापर्यंत संपकरी एस्.टी. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी ७ वेळा आवाहन करण्यात आले. यापुढे मात्र जे कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची आवश्यकता नाही, असे आमचे मत आहे. ते शिक्षेस पात्र आहेत. १ एप्रिलपासून जे कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी परिवहनमंत्री अनिल परब यांनी ३१ मार्च या दिवशी दिली.