उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. प्रद्युम्न ठाकरे हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. प्रद्युम्न सचिन ठाकरे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६३ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये साधनेचे अपुरे प्रयत्न यामुळे त्याची पातळी तेवढीच राहिली आहे. त्याच्यासाठी नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष आणि त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल अन् त्याची पातळी पुन्हा वाढेल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
अमरावती येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. प्रद्युम्न सचिन ठाकरे याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. प्रियंका सचिन ठाकरे (प्रद्युम्नची आई), अमरावती
१. राष्ट्राभिमान : प्रद्युम्नला राष्ट्राप्रती अभिमान आहे. वस्तू खरेदी करतांना प्रत्येक वेळी ‘ती स्वदेशी आहे का ?’, याची तो निश्चिती करतो. त्याने रक्षाबंधनानिमित्त स्वदेशीच राखी खरेदी केली.
२. चित्रकलेची आवड : त्याला चित्रकलेची पुष्कळ आवड आहे. तो नेहमी देवतांचीच चित्रे काढतो. चित्रे काढतांना त्याच्यामध्ये चिकाटी जाणवते.
३. साधकांत जास्त रमणे : समाजातील इतर मुलांशी खेळणे त्याला आवडत नाही. तो एकटा किंवा लहान बहीण आणि बालसाधक यांच्यासह खेळतो.
४. विचारण्याची वृत्ती : तो घराच्या बाहेर जातांना प्रत्येक वेळी विचारूनच बाहेर जातो.
श्री. सचिन मधुकर ठाकरे (प्रद्युम्नचे वडील)
१. चूक स्वीकारणे : प्रद्युम्नला चुकीची जाणीव करून दिल्यावर तो लगेच चूक स्वीकारतो आणि पुन्हा ती चूक होणार नाही, यासाठी प्रयत्न करतो, तसेच तो चुकीसाठी क्षमाही मागतो.
२. आवड-नावड नसणे : भाजीचे महत्त्व समजावून सांगितल्यावर तो न आवडणारी भाजीही खातो.
३. नियमांचे पालन करणे : ‘कोरोना’च्या आजाराविषयीच्या सार्वजनिक नियमांचे, म्हणजेच बाहेर जातांना ‘मास्क’ लावणे, आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धुणे इत्यादींचे तो काटेकोरपणे पालन करतो.
सौ. नलिनी मधुकर ठाकरे (प्रद्युम्नची आजी, वडिलांची आई, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
१. धर्माचरण करणे : प्रद्युम्नला सत्संग ऐकण्याची आवड आहे. तो सत्संग ऐकल्यावर त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करतो. त्याला समाजातील इतर मुलांप्रमाणे केशरचना करायला आवडत नाही. एखादे वेळी मी तशी केशरचना करण्यास सांगितली, तर तो ‘आपल्या आश्रमात चालत नाही. त्यामुळे मी सात्त्विक केशरचनाच करणार’, असे उत्तर देतो. तो शाळेत जातांना नेहमी टिळा लावून जात असे.
२. आश्रम सेवेची आवड : आपत्काळाविषयी कळल्यावर तो आपत्काळासाठी पिशवी (‘बॅग’) भरून ठेवण्याविषयी सांगून ‘आपल्याला आश्रमात कधी जायचे आहे ?’, याविषयी विचारणा करतो. त्याला आश्रमात राहून सेवा करायला पुष्कळ आवडते.
३. सात्त्विकतेची आवड असणे : तो प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी देवघराजवळ बसून गणपतिस्तोत्र, रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणतो. त्याला अग्निहोत्र करायला पुष्कळ आवडते.
४. इतरांचा विचार : त्याला बोलावल्यावर तो लगेच साहाय्याला येतो.
५. व्यवस्थितपणा : तो बरेचदा स्वतःच बैठकीची खोली आवरून ठेवतो.
६. तो सजीव आणि निर्जिव कुठल्याही वस्तूला पाय लागल्यावर लगेच नमस्कार करतो.
श्री. मधुकर ठाकरे (प्रद्युम्नचे आजोबा, वडिलांचे वडील, वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
उत्साही आणि आनंदी : प्रद्युम्न नेहमी उत्साही, आनंदी आणि सकारात्मक असतो. तो कोणत्याही सेवेला तत्पर असतो.
प्रद्युम्नचे स्वभावदोष ः आळस, भीती, राग येणे.
(सर्व सूत्रांचा दिनांक १८.१०.२०२१ आहे.)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |