‘बिहार राज्यात असलेल्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात बलथर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अनिरुद्ध यादव या तरुणाला डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावल्यावरून पकडून नेले होते. या तरुणाला पोलीस ठाण्यात नेऊन प्रचंड मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक गावकर्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून तोडफोड केली आणि त्याला आग लावली. येथील पोलीस अधीक्षक उपेंद्रनाथ वर्मा यांनी दावा केला की, अनिरुद्ध यादव याचा मृत्यू मधमाशांनी चावा घेतल्याने झाला.’