परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या आश्रमांचे अद्वितीयत्व !

साधकांची साधना होण्यासाठी आश्रमांची स्थापना करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१. साक्षात् ब्रह्मांडनायक विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली वास्तू कोणती ?, तर ‘सनातनचा आश्रम’ !

२. संत आणि साधक यांचा चरणस्पर्श लाभत असलेली वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !

कु. सविता जाधव

३. जिवाला त्याच्यातील ईश्वरी अंशाची जाणीव करून त्याला ‘संत’ म्हणून घडवणारी वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !

४. मनाला आनंद देऊन वैकुंठातील वातावरण अनुभवायला देणारी वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !

५. मनःशांती देऊन मोक्षाची वाट दाखवणारी आणि त्या दिशेने घेऊन जाणारी पवित्र वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !

६. ईश्वरी राज्यात रहाणार्‍या साधकांची पिढी निर्माण करणारी वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !

अशा पवित्र वास्तूस माझा नमस्कार !

या घोर कलीयुगात असंख्य जिवांना पृथ्वीवर जन्माला घालून त्यांचा उद्धार करण्यासाठी पवित्र आणि चैतन्यदायी आश्रमांची स्थापना करणार्‍या सर्वशक्तीमान, सर्वश्रेष्ठ अन् कृपाळू गुरुमाऊलींच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

– सुश्री (कुमारी) सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक