
अक्कलकोट – सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामींची मनापासून भक्ती करतो. स्वामीभक्त या नात्याने ते माझे दिनक्रम आहे. स्वामी भक्तीसमवेत मी विश्व हिंदू परिषदेच्या अनेक कार्यात अत्यंत तळमळीने सेवा करत आहे. या कार्यास श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद नेहमीच आहेत. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यास स्वामी कृपेचे मोठे पाठबळ आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर यांनी व्यक्त केले.
बाबूजी नाटेकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी नाटेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष रवि जोशी, शिवशरण अचलेर, संस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी आदी उपस्थित होते.
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !