मध्यप्रदेशच्या भिंड येथील घटना !
मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहादचा कायदा असूनही धर्मांध हे हिंदु मुलींची फसवणूक करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, हे संतापजनक ! अशा उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

भिंड (मध्यप्रदेश) – येथे महंमद खान नावाच्या धर्मांधाने त्याची ओळख लपवून एका अल्पवयीन हिंदु मुलीशी ओळख केली. नंतर विवाहाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. महंमद खान याचे लग्न झाले असून तो ४ मुलांचा पिता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० मासांपूर्वी भ्रमणभाषद्वारे एक हिंदु मुलगी महंमद खान याच्या संपर्कात आली. त्यानंतर दोघांची ओळख झाली. त्या वेळी महंमद खान याने त्याचे नाव ‘निशांत कुमार’ असल्याचे सांगितले. काही दिवसांनी महंमद खान याने मुलीला लग्नाचे वचन देऊन तिचे लैंगिक शोेषण केले. त्यानंतर काही मासांनी सदर मुलीने महंमद खान याचे मतदान ओळखपत्र पाहिल्यावर त्याचे खरे नाव तिला कळले. सत्य समजताच या मुलीने महंमद खान याच्याशी संपर्क तोडला. त्या वेळी त्याने त्या मुलीच्या घरी येऊन गोंधळ घातला. गोंधळ ऐकून आजूबाजूच्या लोकांनी येऊन महंमद खान याला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे