अपघातात मंडल अधिकार्याचा मृत्यू, तर तहसीलदार गंभीर घायाळ

बीड – अवैध वाळू उपसा आणि वाळूची अवैध वाहतूक करणार्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या वाहनास अपघात झाला आहे. या अपघातात मंडल अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून बीडचे तहसीलदार गंभीर घायाळ झाले आहेत. ६ मार्चच्या पहाटे सावळेश्वर फाटा (तालुका गेवराई) येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा जिल्हा रुग्णालयात आले होते.

सावळेश्वर फाटा येथे ६ मार्चच्या पहाटे महसूल पथकाचे वाहन रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळले. वाहनाचा समोरील भाग झाडाच्या खोडात अडकला होता. अपघात होताच आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घायाळ झालेल्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !