- हिजाबचे प्रकरण ज्या वेगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले, त्यावरून ‘हे षड्यंत्र असून यामागे धर्मांध संघटनांचा हात आहे’, हे स्पष्ट असतांना निवडणुकांच्या नावाखाली त्यापासून जाणीवपूर्वक लक्ष भरकटवण्याचा अख्तर यांचा प्रयत्न दिसून येतो. धर्मांधांना पाठीशी घालण्याचा अख्तर यांचा प्रयत्न लोकांपासून लपून रहात नाही !
- अख्तर हेच हिंदूंच्या विरोधात सतत विधाने करून वातावरण तापवत असतात, हे सूज्ञ जनता जाणून आहे !
- निवडणुका असोत किंवा नसोत, धर्मांधांकडून मात्र बाँबस्फोट, दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या यांद्वारे देशातील वातावरण वेळोवेळी तापवले जाते, हा इतिहास आहे ! हे सत्य सांगण्याचे धाडस अख्तर का दाखवत नाहीत ?
पुणे – ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते, ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात. पावसाळा जवळ आला की, बेडूक जसे बाहेर येतात, त्याप्रमाणे निवडणुका जवळ आल्या की, हिजाबसारखी सूत्रे तापवली जातात. निवडणुका संपल्या की, अशी सूत्रेही आपोआप संपतात, असे विधान गीतकार जावेद अख्तर यांनी केले. विसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
अख्तर पुढे म्हणाले की, आज माणसे भावनिकदृष्ट्या संवेदनशील होत चालली आहेत. आयुष्यात काहीही विधायक काम न केलेल्याच व्यक्ती विरोधाचा पवित्रा घेतात. काही न करता लोकांच्या धार्मिक भावना लगेच दुखावतात. नैतिक मूल्यांना धक्का लागला, तर कुणाच्या भावना दुखावल्याचे कधी ऐकिवात आहे का? (हिंदुद्वेष जोपासणारे नैतिक मूल्यांच्या गोष्टी करतात, हा मोठा विनोद आहे ! – संपादक) ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते, ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात. (हे अख्तर यांनी स्वत:च्या बांधवांना सांगितले पाहिजे ! – संपादक)