पालकांचे आद्यकर्तव्य !

वर्षा कुलकर्णी

व्हॅलेंटाईन डे म्हणजे १४ फेब्रुवारी या दिवशी ‘संभाजीनगर येथे हा दिवस कसा साजरा झाला’, याविषयीची माहिती एका वृत्तपत्रात वाचली. त्यात बीबी का मकबर्‍याच्या मागील निर्जन ठिकाणी पोलिसांच्या ‘दामिनी’ (महिलांसाठीचे विशेष पथक) पथकाने केलेल्या कारवाईचा सविस्तर वृत्तांत देण्यात आला होता. या पथकाने ३५ प्रेमीयुगुलांचे समुपदेशन केले. या वेळी ‘प्रेमीयुगुलांतील बहुतांश मुली या अल्पवयीन होत्या. पोलीस म्हणून आम्ही आमचे दायित्व पार पाडत आहोत; मात्र पालकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे’, असे सांगून पोलिसांनी पालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. या वेळी महिला पोलिसांनी एका मुलीच्या आईला दूरभाष केला असता ‘माझी मुलगी शिकवणीसाठी गेली आहे’, असे आईने सांगितले. हा सर्वच वृत्तांत वाचून मन सुन्न झाले.

भरकटलेल्या मुली आणि पालकांची भूमिका !

ज्या वयात भविष्यात काही तरी करून दाखवण्याची खुमखुमी हवी, त्या वयातील मुली प्रेमाच्या पोकळ धुंदीत वावरून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्याही पुढे जाऊन पालकही ‘आपल्या मुली काय करतात ?’, याविषयी अनभिज्ञ आहेत. ‘आपली मुलगी कुठे जाते ?’, ‘कुणासोबत असते ?’, ‘कसला अभ्यास करते ?’, हे जाणून घेण्याइतपत पालक सतर्क असतात का ? हे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे या अल्पवयीन मुली ‘शिकवणीवर्गाला जाते’, असे सांगत निर्जनस्थळी स्वतःच्या प्रियकरासोबत वेळ घालवत आहेत. ३१ जुलै २०१३ मध्ये मुंबईतील निर्जन असलेल्या शक्ती मिलच्या परिसरात १९ वर्षीय तरुणी तिच्या प्रियकरा समवेत गेली होती. त्या वेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी निर्जनस्थळी गेलेल्या संभाजीनगर येथील मुलींच्या जीवनात असे काही आक्रित घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे’, ‘गुंड मोकाट आहेत’, असे कितीही जरी आपण म्हटले, तरी घरी खोटे बोलून असुरक्षित ठिकाणी जाण्याची चूक मुली करतात, हेही तितकेच खरे.

हिंदु मुलींना धर्मशिक्षण अपरिहार्य !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचा उदो उदो करण्यात येत असल्याने पाल्यांवरील पालकांचे नियंत्रण ढासळत चालले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु महिला आणि मुली ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, बलात्कार यांसारख्या अत्याचारांना बळी पडत आहेत. नीतीमत्ता आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत रहाण्यासाठी धर्मशिक्षण अन् गुरुकुल शिक्षणपद्धतीची अपरिहार्यता पुन्हा एकदा लक्षात येते. युवा वयातच ‘स्त्री’ला धर्मशिक्षण आणि नीतीमूल्यांचे शिक्षण लाभल्यास मनोबल वाढून आयुष्यात येणार्‍या प्रत्येक कठीण प्रसंगांना ती धीराने सामोरी जाऊ शकते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘या जगात काहीतरी पेरल्याविना काही उगवत नाही’, मग सध्याच्या काळात नीतीमत्ता संपन्न नारी शक्ती निर्माण होण्यासाठी आणि पर्यायाने धर्माला आलेली ग्लानी रोखण्यासाठी लहानपणापासूनच मुलींच्या मनावर धर्मशिक्षण रुजवायला नको का ? ज्या वेळी हिंदु स्त्री स्वत:चा धर्म सोडते, त्या वेळी खर्‍या अर्थाने धर्माचा र्‍हास होण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे हिंदु धर्माचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मुलींना धर्मशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे, हे पालकांचे आद्यकर्तव्य बनले आहे.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर


मुसलमान मुलींना त्यांची संस्कृती जपायची आहे, तर हिंदु मुली पाश्चात्त्य संस्कृती कवटाळत आहेत !

आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु मुली वाया जात आहेत. आज तोकडे कपडे घालून फिरत असलेल्या ९९ टक्के मुली या हिंदु आहेत. अश्लीलतेमुळे बलात्काराला बळी पडत असलेल्या ९९ टक्के मुली हिंदु आहेत. मुसलमान मुलींना त्यांची संस्कृती जपायची आहे, तर हिंदु मुलींना पाश्चात्त्य संस्कृती जवळ करायची आहे. मी हिजाब आणि बुरखा यांच्या विरोधातच आहे. हिजाबवरून पेटलेल्या मुसलमान मुली बघून, ‘हिंदु मुलींना स्वधर्माविषयी कसलीही आपुलकी नाही’, याचे वाईट वाटते. परकीय ख्रिस्त्यांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानत असलेल्या हिंदु मुलींना साडी, हिंदु धर्मात शोभतील असे कपडे घालणे कमीपणाचे वाटते, हे दुर्दैवी आहे.

हिंदु मुलींनीही धर्मनिष्ठा जपली पाहिजे. आपले संस्कार जपले पाहिजेत. मुसलमान मुलींना बुरखा घालून फिरायला लाज वाटत नाही; पण हिंदु मुलींना कपाळी कुंकू, टिकली लावायला लाज वाटते. हे सत्य आहे. हे कुठेतरी चुकत आहे. ते सुधारले पाहिजे.

– शेळके माऊली (‘व्हॉट्सॲप’वरील लिखाण)