१. उत्तम स्मरणशक्ती
‘वर्ष १९६९ ते वर्ष १९७१ या काळात देशमुखकाकांनी संत कबिरांचे दोहे ऐकले होते; मात्र ते त्यांच्या मनात नेहमीसाठी कोरले गेले आहेत.
२. अभ्यासू वृत्ती
अ. काकांनी पूर्वी श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन केले होते. सनातन संस्थेमध्ये आल्यावर त्यांची एक वेगळीच घडण होत गेली. त्यांनी ‘भक्तीमार्गातून ज्ञानमार्गाकडे कसे जायचे ?’, याचा अभ्यास चालू केला.
आ. पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू)) यांचे सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथही त्यांनी २ – ३ वेळा वाचले आहेत. त्यातून त्यांना ज्ञानमार्गाविषयीची परिपूर्ण माहिती मिळाली. गुरुकृपेमुळे ते त्यावर चिंतन करू शकले.
३. प्रगल्भता
ज्ञानमार्गाचा अभ्यास करतांना ‘बुद्धी, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांची सांगड कशी घालायची ? आपल्या ज्ञानाचा वापर अध्यापनासाठी कसा करावा ?’, हे गुरुकृपेमुळेच त्यांना अवगत झाले. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लेख सिद्ध करतांना ‘त्यांच्या ज्ञानाचे (अनुभवाचे) लिखाण सर्वांना समजावे’, असा त्यांचा प्रयत्न असतो.
४. त्याग
श्री. देशमुखकाकांनी दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) या पदावर काम केले होते. आता ते साधनेच्या दृष्टीने रामनाथी आश्रमात रहायला आले आहेत. यातून त्यांनी ‘मायेतील विचारांचा, म्हणजे व्यावहारिक जीवनाचा त्याग केला आहे’, असे लक्षात येते.
५. साधनेसाठी मनाचा संघर्ष करणे
साधना करतांना त्यांना मनाशी पुष्कळ संघर्ष करावा लागला. साधनेचे चांगले प्रयत्न केल्यामुळे ते त्या संघर्षावर मातही करू शकले. ‘गुरुकृपाच सर्वकाही पालट करू शकते’, हे त्यांच्या लक्षात आल्यावर आता त्यांना ‘आपले उर्वरित आयुष्य परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी घालवावे’, असे वाटते. ‘त्यांची कृपा आपल्यावर सदोदित असावी’, असे ते नेहमी चिंतन करतात.
६. श्री. शिरीष देशमुख यांच्यामध्ये जाणवलेला पालट !
अ. आवड-नावड न्यून होणे : पूर्वी त्यांना खाण्याच्या पदार्थांविषयी आवड-नावड होती. आता त्यांची आवड-नावड अल्प झाली आहे. आता त्यांना मीठ न घातलेले पदार्थ खावे लागतात. त्यांनी ते सर्व स्वीकारले आहे.’
– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |