श्री. शिरीष देशमुख हे पूर्वी दैनिक ‘लोकमत’मध्ये महाव्यवस्थापक होते. त्या वेळी त्यांचे विचार पुष्कळ वेगळे होते. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट झाला. आता ते गेली ८ वर्षे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा आणि साधना करत आहेत. ते मराठी भाषेतील लिखाण इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याची सेवा मोठ्या तळमळीने करत होते. आता सध्या शारीरिक स्थितीमुळे त्यांना सेवा करणे शक्य होत नसले, तरी ते परिस्थिती स्वीकारून आश्रमात आनंदाने राहिले आहेत. त्यांचे सहसाधक श्री. अरविंद ठक्कर यांना श्री. शिरीष देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणे
‘श्री. शिरीष देशमुख यांना स्वतःच्या आजाराचे (दोन्ही मूत्रपिंड निकामी होणे) गंभीर स्वरूप आणि त्याचे परिणाम यांविषयी पूर्ण कल्पना आहे. असे असूनही त्यांनी स्थिर राहून कठीण परिस्थिती स्वीकारली आहे.
२. सेवेची तळमळ
अ. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या ते खोलीतच असतात. त्यांना सेवा करणे शक्य होत नाही, तरीही ते सेवा आणि साधक यांच्याविषयी माझ्याकडे विचारपूस करतात. ते सध्या चालू असलेल्या सेवांविषयी माझ्याकडून उत्सुकतेने जाणून घेतात.
आ. पूर्वीप्रमाणे आता माझे त्यांच्याशी फारसे बोलणे होत नाही. आम्ही दिवसातून एक-दोन वेळा भेटतो आणि बोलतो. तेव्हा काका मायेतील किंवा व्यावहारिक गोष्टींविषयी न बोलता केवळ साधना किंवा सेवा यांविषयीच बोलतात.
३. श्री. शिरीष देशमुख यांच्यामध्ये जाणवलेले पालट !
३ अ. नम्रता : पूर्वी ते व्यावहारिक क्षेत्रात ‘अभिमान वाटावा’ अशा मोठ्या पदावर कार्यरत होते. ते दैनिक ‘लोकमत’ मध्ये महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) होते; परंतु आता त्यांची देहबोली पालटली असून त्यांच्यामध्ये पुष्कळ नम्रता जाणवते.
३ आ. अपेक्षा न्यून होणे : पूर्वी त्यांच्या साधकांकडून अपेक्षा असायच्या; मात्र आता त्या पुष्कळ न्यून झाल्या असून आता ते स्वतःची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करतात.
३ इ. अंतमुर्खता वाढणे : आता त्यांची अंतर्मुखताही वाढली आहे.’
– श्री. अरविंद ठक्कर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |