ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे कॅनडामध्ये आणीबाणी लागू

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (उजवीकडे)

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक केल्याने गेल्या काही दिवसांपासून देशभरातून त्यास विरोध होत आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या निवासस्थानाला २० सहस्र ट्रकद्वारे ५० सहस्र ट्रकचालकांनी घेराव घातला आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रूडो यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. कॅनडामध्ये ५० वर्षांत प्रथमच आणीबाणी लागू करण्यात आली आहे.