पंतप्रधान मोदी यांच्याकडून आभार व्यक्त !

मनामा (बहरीन) – संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी आणि दुबई याच्यानंतर आता बहरीन येथेही हिंदु मंदिर उभारण्यात येणार आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचे पंतप्रधान बिन हमाद अल् खलिफा यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सलमान बिन हमाद अल् खलिफा यांच्याशी दूरभाषवर संवाद साधला. या वेळी त्यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि बहरीन हे दोन्ही देश वर्ष २०२१ – २२ मध्ये आपापसांतील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहेत.
Had a warm conversation with HRH Prince Salman bin Hamad Al Khalifa, Crown Prince & Prime Minister of Bahrain. Thanked him for the Kingdom’s attention to the needs of the Indian community, including recent decision on land allotment for the Swaminarayan temple. @BahrainCPnews
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या संवादाविषयी माहिती दिली. त्यांनी म्हटले की, स्वामीनारायण मंदिरासाठी भूमी वाटपाच्या निर्णयासह भारतीय समुदायाच्या गरजांकडे लक्ष दिल्याबद्दल मी खलिफा यांचे आभार मानले.
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण