पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.१.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) भाविनी कापडिया यांचा ४० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सुश्री (कु.) भाविनी कापडिया यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सौ. आरती भानु पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘भाविनीचे रहाणीमान साधे आहे आणि तिच्या आवश्यकताही अल्प आहेत.
२. प्रेमभाव
अ. मला बर्याच दिवसांपासून शारीरिक त्रास होत होता. माझे दुखणे उणावत नव्हते. भाविनीने माझ्याकडून माझ्या त्रासाविषयी जाणून घेतले. तिने माझ्यावर उपचार करणार्या वैद्यांशी त्याविषयी बोलून ‘आणखी काही वेगळे उपचार करणे अपेक्षित आहे का ?’, असे विचारले आणि मला तसे उपचार करण्यास सांगितले.
आ. एखाद्या साधिकेला त्रास होत असल्यास ती तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवते.
३. अभ्यासू वृत्ती
अ. एखाद्या साधकाने तिला सूक्ष्म जगताविषयी काही शंका विचारल्यास ती त्या शंकांचा अभ्यास करते आणि तिच्या परीने त्यांचे उत्तर काढून ते योग्य असल्याची निश्चिती करून घेते.
आ. भाविनीची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता पुष्कळ चांगली आहे. कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांना होत असलेल्या आध्यात्मिक त्रासावर उपाय सांगण्याची सेवा तिच्याकडे आहे. तिने एखादा उपाय सांगितल्यावर ‘त्याचा परिणाम किती काळ टिकतो ? कोणत्या परिस्थितीत त्या साधकाचा त्रास पुन्हा त्रास वाढतो ?’ इत्यादी घटकांचा ती जिज्ञासेने अभ्यास करते आणि पुढील वेळी उपाय सांगतांना त्याचा उपयोग करते. तिला एखादी शंका असेल, तर त्याविषयी ती जाणकार साधक किंवा संत यांना विचारते.
४. साधकांची स्थिती समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे
आश्रमातील अनेक साधक भाविनीशी बोलून मन मोकळे करतात. ती साधकांना मानसिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर आणि प्रेमाने हाताळते. समोरच्याला कधी कधी ती सांगत असलेले सूत्र स्वीकारणे कठीण जाते. त्या वेळी ती त्या साधकाची परिस्थिती समजून घेते आणि त्या साधकाच्या स्थितीला जाऊन त्याला हाताळते.
‘भगवंता, ‘तू मला भाविनीसारख्या साधकांच्या सहवासात ठेवले आहेस’, त्याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तिच्याकडून अधिकाधिक शिकून ते कृतीत आणता येऊ दे’, हीच तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’ (२२.१.२०२२)
सुश्री (कु.) अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
‘भाविनीला ‘आश्रमातील साधकांना काय आवडते ?’, हे ठाऊक असते. त्यानुसार ‘साधकांच्या वाढदिवसाला खाऊ किंवा छोटी भेटवस्तू देणे, त्यावर त्या साधकाच्या प्रकृतीनुसार प्रार्थना लिहून देणे किंवा कृष्णाचे चित्र काढून देणे’, अशा छोट्या छोट्या गोष्टींतून तिचे प्रेम व्यक्त होत असते.
२. साधक आणि समाजातील व्यक्ती यांच्याशी जवळीक साधणे
भाविनीची कोणत्याही साधकाशी पटकन जवळीक होते. साधक तिच्याशी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकतात. केवळ रामनाथी आश्रमातीलच नव्हे, तर इतर राज्यांतील, तसेच विदेशातील साधकांशीही तिची जवळीक आहे. भाविनी छपाईच्या सेवेसाठी बेंगळुरू येथे गेली होती. तेथील मुद्रणालयात काम करणार्या व्यक्तींशीही तिची साधकांप्रमाणेच जवळीक झाली. त्यांतील एका व्यक्तीच्या जीवनात बर्याच अडचणी होत्या. त्या कळल्यावर भाविनीने त्या व्यक्तीलाही नामजप करण्यास सांगितले. नंतर कधी संपर्क झाल्यास भाविनी त्या व्यक्तीला ‘जप करत आहेस ना ?’, असे विचारत असते.
३. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना साहाय्य करणे
भाविनी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना समजून घेते. एखाद्या साधकाला आध्यात्मिक त्रास होत असल्यास भाविनीच्या ते पटकन लक्षात येते. त्यानुसार बर्याचदा ती त्या साधकाला त्याविषयी विचारून नामजपादी उपाय सांगत असते. ती त्यांना ‘त्रासावर मात कशी करायची ?’, याविषयी सांगून साहाय्य करते. एवढ्यावरच न थांबता ‘त्रास असलेल्या साधकांसाठी काय केले, तर त्यांना साधनेत प्रोत्साहन मिळून ते उत्साही होतील ?’, असा तिचा सतत प्रयत्न असतो.
४. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
‘एखाद्या ठिकाणची, तसेच साधकाकडून येणारी स्पंदने कशी आहेत ?’, हे तिला पटकन कळते. त्रास होत असलेल्या साधकांनी तिने सांगितलेला नामजप केल्यावर त्यांना त्याचा लाभ होतो. आध्यात्मिक त्रासावर तिला काही वेगळा आध्यात्मिक उपाय सुचवायचा असल्यास त्याविषयी ती सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना विचारते. सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेली उत्तरे आणि भाविनीची उत्तरे बर्याचदा एकच असतात. ती साधकांना केवळ उपाय सांगून थांबत नाही, तर ‘त्या साधकाला काही वेळाने किंवा काही दिवसांनी कसे वाटते ?’, याची निश्चिती करते.
‘हे श्रीकृष्णा, भाविनीसारखी प्रेमळ आणि निर्मळ मैत्रीण दिल्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘भाविनीतील प्रेमभाव आणि साधकांना समजून घेणे’, हे गुण माझ्यातही निर्माण होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’ (२०.१.२०२२)
|