‘वाराणसी येथील सेवाकेंद्राच्या प्रांगणात एक पेरूचे झाड आहे. या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.
त्या झाडाचा बुंधा मध्यम आकाराचा आहे. या झाडाकडे पाहिल्यावर आनंद आणि उत्साह जाणवतो.’
– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती. (२२.७.२०२०)
(‘साधक रहात असलेले आश्रम किंवा सेवाकेंद्रे म्हणजे हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेसाठी साधक करत असलेल्या समष्टी कार्याची केंद्रे आहेत. साधक हे कार्य स्वतःची समष्टी साधना म्हणून (समाज सात्त्विक होण्यासाठी करायचे प्रयत्न) करत असल्याने, तसेच ते व्यष्टी साधनाही (ईश्वरप्राप्तीसाठी करायचे प्रयत्न) करत असल्याने त्यांना या कार्यासाठी ईश्वराचा कृपाशीर्वाद मिळतो. त्यामुळे साधक रहात असलेल्या आश्रमांत आणि सेवाकेंद्रांत चैतन्य असते. या चैतन्याचा परिणाम सेवाकेंद्रे किंवा आश्रम यांच्या भोवतीच्या वातावरणावरही होतो. त्यामुळे त्यांच्या परिसरात लावलेली झाडे तजेलदार दिसतात, तसेच त्यांना भरभरून फुले आणि फळे येतात.’ – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |