(म्हणे) ‘ज्याची बायको पळून जाते त्याचेच नाव मोदी ठेवले जाते !’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात नाना पटोले केवळ भाजपद्वेषी वादग्रस्त विधाने करून काँग्रेसींना प्रशिक्षण देत आहेत, असेच यावरून वाटते. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपद्वेषाने पछाडलेल्या अशा लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत जनतेने घरी बसवावे ! – संपादक 

नाना पटोले

घोटी (जिल्हा नाशिक) – लोक भाजपला हसतात. ज्याची बायको पळते त्याचे नाव मोदी ठेवले जाते. आम्ही मोहनदास गांधी यांच्या विचारांचे लोक आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाहीत. त्यांच्याच मनात विचार येतात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २४ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ते इगतपुरी येथे चालू असलेल्या मुंबई काँग्रेसच्या ३ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.

(सौजन्य : Nashik News)

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले दारूड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतील, अशी चेतावणी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात या विषयावरून भाजपद्वारे आंदोलन होण्याची शक्यता आहे.