आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर पुरातत्वज्ञ डॉ. आर्. नागस्वामी यांचे निधन

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर पुरातत्वज्ञ डॉ. आर्. नागस्वामी

चेन्नई – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर पुरातत्वज्ञ आणि शिलालेख तज्ञ डॉ. आर्. नागस्वामी यांचे २३ जानेवारी या दिवशी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी पुरातत्व खात्यात केलेल्या अतुलनीय कार्याची नोंद घेत त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते. वर्ष १९६६ मध्ये तमिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुरातत्व विभागाचे त्यांनी २२ वर्षे व्यवस्थापक म्हणून कार्य पाहिले. ‘तमिळी संस्कृती ही भारतीय संस्कृतीतून निर्माण झाली आहे’, असे त्यांनी अभ्यासाअंती सिद्ध केले. भारतातून तस्करी करून लंडन येथे नेण्यात आलेली नटराजाची मूर्ती परत भारतात आणण्यासाठी डॉ. नागस्वामी यांची भूमिका महत्त्वाची होती.