कोलार (कर्नाटक) येथील सरकारी शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण

हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या विरोधानंतर जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशीचा आदेश

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

कोलार (कर्नाटक) – येथील सरकारी शाळेतील वर्गामध्ये २० मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केले. याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनेला मिळाल्यावर तिने याचा विरोध केल्यामुळे नमाजपठण बंद करण्यात आले. ही घटना शुक्रवार, २१ जानेवारी या दिवशी घडली. यानंतर कोलारचे जिल्हाधिकारी उमेश कुमार यांनी या शाळेला या घटनेचा अहवाला सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना शाळेमध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

१. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्याध्यापिकेने मुले शाळेच्या बाहेर जातील; म्हणून त्यांना वर्गातच नमाजपठण करण्याची अनुमती दिली. कोरोना नियमांमुळे शाळा गेले २ मास बंद होती.

२. मुख्याध्यापिका उमा देवी यांनी याविषयी सांगितले, ‘मी नमाजपठणाला अनुमती दिली नव्हती. मुलांनी स्वतःहून नमाजपठण केले. ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा मी शाळेमध्ये नव्हते. जेव्हा मला शिक्षणाधिकार्‍यांनी दूरभाष करून याविषयीची माहिती दिली, तेव्हा मी हे थांबवले.’