काबूल येथील गुरुद्वारावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी फारूकी याची हत्या

फारूकी

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट-खुरासानचा माजी प्रमुख असलम फारूकी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये काबूल येथील गुरुद्वारावर झालेल्या आक्रमणाचा फारूकी हा मुख्य सूत्रधार होता.

यासह तो भारतातील मुसलमान तरुणांना त्याच्या संघटनेत भरती करण्याचा प्रयत्न करत होता. फारूकी याची हत्या आपसांतील वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.