‘इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच. मग भीष्म सांगतात तसा अध्ययन न करणारा, उन्मत्त, अधम विप्र (ब्राह्मण) आढळायचा नाही. प्रजारक्षण न करणारा राजा दिसायचा नाही. जलवर्षाव न करणारा मेघ दिसायचा नाही. सज्जन पालक आणि दुर्जन संहारक राजा असला की, विश्वात सगळे स्थिर होईल. ‘या जगातील सगळ्या सत्ताधिशांनो, रक्षण करणार असाल, तरच सत्ताधीश व्हा !’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक घनगर्जित (ऑगस्ट २०२१))