बुर्‍हानपूर (मध्यप्रदेश) येथील श्रीमती विमलबाई सोनी (वय ८६ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्रीमती विमलबाई सोनी

श्री. राजू सोनी (मोठा मुलगा)

१. कठीण प्रसंगात स्थिर रहाणे

‘माझी आई श्रीमती विमलबाई (वय ८६ वर्षे) सर्वांशी चांगले वागते. वर्ष १९७२ मध्ये आमच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला होता. माझ्या धाकट्या भावाच्या जन्माच्या वेळी आम्हाला रहायला घर नव्हते. नंतर आम्ही घर घेतले; परंतु ते घर मनासारखे मिळाले नाही, तरीही आईने ते सर्व स्वीकारले.

२. समाधानी वृत्ती

ती नेहमी समाधानी आणि स्थिर असते. ती प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात समभावाने रहाते.’

श्री. संतोष सोनी (धाकटा मुलगा)

१. अनेक अडचणींवर मात करून साधनेत सातत्य ठेवणे

‘आईच्या पायाचा ३० वर्षांपूर्वी अस्थिभंग झाला होता. तिच्या पायात स्टीलची सळी (स्टीलचा ‘रॉड’) घातली आहे. तिचे शस्त्रकर्म झाल्यानंतरही ती मंदिरात जायची. ती पुष्कळ अंतर पायी चालत असे. ती स्वामीनारायण आणि अन्य मंदिरांमध्ये १०८ वातींचा दिवा लावायला जात असे. ती ३० वर्षांपूर्वी हरिद्वार आणि ऋषिकेश या तीर्थक्षेत्री जाऊन आली आहे.

२ . दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व जाणून इतरांनाही ते वाचण्यास देण्यास सांगणे

ती गायत्री परिवार, ठाकूर बाबा यांच्या सत्संगात जात होती. या वर्षापासून ती दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून त्यानुसार साधना करत आहे. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ स्वतःजवळ ठेवून झोपते. ती ‘सनातन प्रभात’ स्वतः वाचल्यानंतर दुसर्‍यांनाही वाचायला देते. आमचे ‘गॅरेज’ आहे. ती मला सांगते, ‘‘गॅरेज’मध्ये कुणी चांगली व्यक्ती आली, तर त्यांना ‘सनातन प्रभात’ वाचायला दे.’’

३. नामजपाची ओढ

आई सतत नामजप करते आणि ती इतरांनाही नामजप करायला सांगते. तिला रात्री झोप आली नाही, तर ती उठून नामजप करते. आईची भगवंतावर पुष्कळ श्रद्धा आहे.

४. वर्ष १९८२ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. तेव्हाही ती स्थिर होती.

सौ. रजनी सोनी (धाकटी सून)

प्रेमभाव

‘सासूबाई मला सुनेप्रमाणे वागणूक न देता आईची माया देतात. त्या लहान मुलांवरही पुष्कळ प्रेम करतात.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक फेब्रुवारी २०२०)