मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू होण्यापूर्वी २२ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या पायर्यांवर बसून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पेपरफुटी, शेतकर्यांचे वीजदेयक, आरोग्य विभाग भरती, म्हाडा भरती या संदर्भात झालेल्या घोटाळ्यांच्या विषयी सरकार ठोस कृती करत नसल्यामुळे विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.