जागेअभावी काही प्रवाशांना उभे राहून करावा लागला प्रवास !
रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून अशा घटना रोखून संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक
मुंबई – धावत्या उपनगरीय रेल्वेमध्ये (लोकलमध्ये) एक मुसलमान व्यक्ती एकाच वेळी ३ जण बसू शकणार्या आसनावर नमाजपठण करत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ही घटना नेमकी कुठल्या शहरात घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत मुसलमान रस्त्यावर, मैदानावर, विमानतळावर, रेल्वेच्या फलाटावर आदी ठिकाणी नमाजपठण करत असल्याचे दिसून आले होते. आता थेट उपनगरीय रेल्वेच्या आसनावर नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे.
‘गलियों में, हाईवे पर, पार्क में’ के बाद प्रस्तुत है लोकल ट्रेन में नमाज
और खबरदार जो आपने विरोध किया… सांप्रदायिक घोषित कर दिए जाओगे pic.twitter.com/uxGvGgYogJ
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) December 18, 2021
१. या व्यक्तीने आसनावर चादर अंथरून त्यावर बसून नमाजपठण करायला चालू केले आणि ही गाडी एका स्थानकावर थांबल्यानंतर चढलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा न देता ही व्यक्ती तिचे नमाजपठण चालूच ठेवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला.
२. मुळात नमाजपठण करण्याची पद्धत असते. त्यानुसार जागेवर प्रथम उभे राहून नंतर बसले जाते. रेल्वेच्या आसनावर उभे रहाण्याची अनुमती नाही. तरीही त्या व्यक्तीने आसनावर प्रथम उभे राहून आणि नंतर बसून नमाजपठण केल्याचे दिसत आहे.