वर्ष २०२० मध्ये देशात ५ सहस्र ५७९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

सर्वाधिक शेतकरी महाराष्ट्रातील !

देशात गेली अनेक वर्षे शेतकरी आत्महत्या करत आहेत; मात्र कोणत्याही शासनकर्त्यांनी युद्धापातळीवर प्रयत्न करून त्या रोखल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – वर्ष २०२० मध्ये देशात एकूण ५ सहस्र ५७९ शेतकर्‍यांनी विविध कारणांमुळे आत्हहत्या केल्या, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी संसदेत दिली. वर्ष २०१९ मध्ये ५ सहस्र ९५७ शेतकर्‍यांनी आत्हमत्या केल्या होत्या. त्यात वर्ष २०२० मध्ये अल्प प्रमाणात घट झाली आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा संदर्भ देत कृषीमंत्री तोमर यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यामागचे विशिष्ट कारण या विभागाने त्याच्या अहवालात दिलेले नाही. तथापि कौटुंबिक समस्या, आजारपण, व्यसन, प्रेम प्रकरण, विवाहाशी संबंधत सूत्रे, बेरोजगारी, व्यावसायिक समस्या, परीक्षेतील अपयश, संपत्तीचा वाद अशा विविध कारणांतून शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्रात २ सहस्र ५६७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात २ सहस्र ५६७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील एकूण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या तुलनेत ही संख्या ४३ टक्के आहे.