उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सुदर्शन पाटील हा या पिढीतील एक आहे !
कु. सुदर्शन अशोक पाटील याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. सुदर्शन अशोक पाटील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याची पातळी ५३ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
कार्तिक पौणिमा (१९.११.२०२१) या दिवशी रत्नागिरी येथील कु. सुदर्शन अशोक पाटील याचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रेमभाव
‘सुदर्शनचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे. लहान मुलांना तो अतिशय प्रेमाने सांभाळतो.
२. शांत स्वभाव
तो अतिशय शांत आहे. त्याच्याकडून चूक झाल्यास आम्ही त्याला रागावलो, तरी तो प्रत्युत्तर देत नाही. तो क्वचितच चिडतो.
३. समजूतदार
तो सर्व मित्रांमध्ये मिळून मिसळून रहातो. तो मित्रांना कुठलेही सूत्र त्यांना पटेल, असे शांतपणे समजावून सांगतो. त्यामुळे त्याची मित्रांच्या समवेत शक्यतो भांडणे होत नाहीत.
४. उत्तम स्मरणशक्ती
सुदर्शन सध्या इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. त्याला एकदा समजावून सांगितल्यावर ते त्याच्या पूर्णपणे लक्षात रहाते आणि त्या विषयाचे त्याला चांगले आकलन होते.
५. घरकामात साहाय्य करणे
तो घरामध्ये केर काढणे, भांडी घासणे आणि दुकानातून वस्तू आणणे इत्यादी कामांमध्ये साहाय्य करतो.
६. देवाची आवड
तो घरी प्रतिदिन संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र, मारुति स्तोत्र, गणपति अथर्वशीर्ष, पसायदान इत्यादी नियमितपणे म्हणतो. त्याला ही सर्व स्तोत्रे पाठ आहेत. तो दिवसातून किमान एक घंटा बसून नामजप करतो.
७. आध्यात्मिक स्तरावरील उपाय नियमित करणे
तो घरातून बाहेर जाण्यापूर्वी नियमितपणे शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे आणि अत्तर अन् कापूर यांचे उपाय करणे, हे सर्व न विसरता करतो.
८. धर्माचरण करणे
तो शाळेत किंवा बाहेर खेळायला जातांनाही कपाळावर कुंकूमतिलक लावूनच जातो.
९. आश्रमात रहाण्याची आवड
सुदर्शनला सेवेची पुष्कळ आवड आहे. आश्रमात गेल्यावर तो आनंदाने सेवा करत होता. त्याने आश्रमजीवनाशी चांगले आणि लवकर जुळवून घेतले. आपण गावाला जाऊया म्हटले की, तो ‘नको’, असे म्हणतो.
१०. स्वभावदोष
राग येणे, चालढकलपणा.
गुरुकृपेने थोडेफार सुचले, ते परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो.’
– श्री. अशोक पाटील (वडील) आणि सौ. सविता पाटील (आई), रत्नागिरी (७.११.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |