श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘ई पास’ सक्ती रहित करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण !

शिवशाही कोल्हापूरच्या वतीने लाक्षणिक उपोषण करणारे कार्यकर्ते

कोल्हापूर, १० नोव्हेंबर (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिरातील दर्शनासाठीची ‘ई पास’ सक्ती रहित करण्यासाठी ‘शिवशाही कोल्हापूर’च्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या आंदोलनास अनेक भाविक, नागरिक, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते यांनी प्रत्यक्ष भेटून आणि स्वाक्षरी करून पाठिंबा दिला. याप्रसंगी ‘शिवशाही’चे संस्थापक अध्यक्ष सुनील सामंत, स्वप्नील सोनावणे, राजू मिरजकर, संजय चव्हाण, महेश खोपडे, सचिन साळोखे, शिवम आयरेकर,  प्रशांत पेडणेकर, मिलिंद कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.