अकोले शहर, सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक यांची चेतावणी !

अकोले (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यालगत असणारे देशी मद्याचे दुकान आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यालगत असणारी ‘वाईन शॉप’ हटवण्याची नागरिकांची मागणी आहे. यासाठी अकोले पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण चालू करणार असल्याची चेतावणी अकोले शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. मद्यबंदी समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. (नागरिकांना असे निवेदन का द्यावे लागते ? सामान्य नागरिकांना जे समजते ते प्रशासनाला का समजत नाही ? – संपादक)
भरवस्तीमध्ये असणार्या या दुकानांमुळे या परिसरामध्ये मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आणि महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घेतलेल्या आमसभेमध्ये ही दुकाने हलवण्याच्या संदर्भात चर्चा होऊनही अद्याप या दुकानांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसली नाही. मद्यविरोधी समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी म्हणाले, ‘‘अवैध मद्य आणि व्यवसाय बंद न करणार्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी. त्याचप्रमाणे ज्यांच्या हद्दीमध्ये मद्यविक्री चालू आहे, त्या भागातील अंमलदारांना निलंबित करावे.’’
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !