आमदार वीरेश बोरकर यांना उपोषण सोडण्याची केली विनंती

पणजी – नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ रहित करण्याच्या मागणीवरून पणजी येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचीही उपस्थिती होती. या भेटीनंतर पत्रकारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आमदार वीरेश बोरकर यांच्या प्रकृतीची मला काळजी आहे. मी आमदार वीरेश बोरकर यांच्याकडे त्यांच्या मागणीवरून चर्चा केली आहे आणि ही चर्चा सकारात्मक झालेली आहे. मी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ (अ) रहित करण्याची मागणी विधानसभेत उठवून त्यावर तोडगा काढण्याची मी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी उपोषण सोडावे, असे मला वाटते.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !