
१. सर्व प्रकारची अनुकूलता असूनही गोर्यांच्या संस्कृतीत लोक झपाट्याने र्हास पावत असणे
‘जेथे गोर्यांच्या संस्कृतीची चलती चालू झाली, तेथील लोक हत्या न होता किंवा खावयास असूनही झपाट्याने र्हास पावून नष्ट होतात. ‘रक्षिण्यासारखे स्वतंत्र असे आपले काही तरी आहे, अशी मनोभावना जिवंत असल्याविना कोणताही मानववंश स्वतंत्र अस्तित्वात राहू शकणार नाही’, असा मानसशास्त्रीय सिद्धांत या प्रकरणी मानववंशशास्त्रवेत्ते आज मांडतांना दिसत आहेत.
२. आर्यांनी सर्वांनाच स्वतःचे वांशिक जीवन उपभोगण्याचे स्वातंत्र्य देणे
आर्यांनी आपली उच्च संस्कृतीही, कातकरी, गोंड, भिल्ल इत्यादी वन्य मानववंशावर लादली नाही आणि यास्तव ते वंश उच्चांच्या निकट राहूनही जिवंत आहेत. इतरांस स्वतःचे स्वतंत्र वांशिक जीवन राखण्यास आर्यांनी जी मोकळीक दिली, त्याचा धूर्त स्वार्थी लोक आज विपरीत अर्थ लावत आहेत आणि ‘यांना मुद्दामच खितपत खाली ठेवण्यात आले’, असा पुकारा करण्यात येत आहे. सर्वांना सारखे करणे यांत शास्त्रीयताही नाही कि भूतदयाही नाही, हे या शहाण्यांस कळेल तो सुदिन !’
– त्र्यंबक शंकर शेजवलकर (संदर्भ : ‘विजयनगरचे ऋण’ पृ. ४, ‘प्रज्ञालोक’, एप्रिल १९८१)
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !