
दोडामार्ग – बांदा-दोडामार्ग-आयी, तसेच दोडामार्ग ते वीजघर या मार्गांच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाचे लक्ष वेधूनही आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात ८ नोव्हेंबरपासून जनआंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, अशी चेतावणी दोडामार्ग भाजपच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक या रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यांच्या कामाची निविदा काढणे आणि कार्यारंभ आदेश काढणे यांस विलंब होण्यास उत्तरदायी कोण ? याविषयी वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊनही आश्वासन देण्यापलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात येणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. या रस्त्यांच्या कामासाठी यापूर्वीही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !