कारागृहातील बंदीवानाला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप
कारागृहातील बंदीवानावर वेळेत उपचार झाले नसतील, तर याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – येथील फतेहगडमध्ये असलेल्या जिल्हा कारागृहात एका बंदीवानाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या अन्य बंदीवानांनी कारागृहाला आग लावली. यासह कारागृह अधीक्षक आणि पोलीस यांच्यावर आक्रमण केले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोळीबार केला. या हिंसाचारात ३० पोलीस आणि बंदीवान घायाळ झाले. घायाळ झालेल्या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या कारागृहात हत्येच्या प्रकरणातील आरोपी संदीप यादव हा बंदीस्त होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सैफई येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. बंदीवानांचा आरोप आहे की, संदीपला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ‘दिवाळीच्या दिवशीही सर्व बंदीवानांना योग्य जेवण मिळाले नाही’, असाही आरोप त्यांनी केला.