सनातन संस्थेमध्ये साधकांच्या साधनेची सर्वांगाने काळजी घेतली जात असल्याचे एक उदाहरण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ज्या पूर्णवेळ साधकांच्या घरी वृद्ध आई-वडील असतात, ते त्यांच्या पालकांप्रतीचे कर्तव्य पार पाडत असतांना आश्रमात सेवेसाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या साधनेवर परिणाम होतो. अशा वेळी ‘साधकांची साधना आणि सेवा यांमध्ये खंड पडू नये’, यासाठी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना आश्रमात रहाण्यासाठी घेऊन यायला सांगण्यात येते. त्यामुळे साधकांची आणि त्यांच्या वृद्ध आई-वडिलांचीही काळजी मिटते. साधक सेवा आणि साधनाही करू शकतात. यामुळे त्यांची साधना होऊन ते साधनेत पुढे जातात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.९.२०२१)