हिंदु संघटनांनी ७०० किलो गोमांसासह पकडली होती गाडी !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे पोलिसांनी माजी केंद्रीय मंत्री सरवर हुसेन यांचा भाऊ अन्वर हुसेन याला अटक केली आहे. ही अटक जानेवारी महिन्यात पकडण्यात आलेल्या ७०० किलोग्रॅमपेक्षा अधिक प्रतिबंधित गोमांसाच्या तस्करीच्या प्रकरणी करण्यात आली आहे.
फॉरेन्सिक लॅबच्या तपासणी अहवालात प्रतिबंधित मांस गोमांस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
🚨 Brother of Former Union Minister Arrested in Cow Slaughter Case 🚨
Anwar Hussain, brother of former Union Minister Sarwar Hussain, has been arrested after a vehicle carrying 700 kg of beef was intercepted near Gabhana Toll Plaza by Gau Rakshaks.
If such a large quantity was… pic.twitter.com/MlAsiAxhYC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2026
१. हे संपूर्ण प्रकरण १५ जानेवारी २०२६ च्या रात्रीचे आहे. गोरक्षा दलाच्या सदस्यांना एका गाडीतून प्रतिबंधित मांस नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. कार्यकर्त्यांनी गभाना टोल प्लाझाजवळ एका वाहनाला घेराव घालून रोखले. या वाहनात बर्फाच्या साहाय्याने बॉक्समध्ये भरून ठेवलेले मांस जप्त करण्यात आले. तपासणी केली असता या मांसाचे एकूण वजन ७०० किलोग्रॅमपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मांसाचा नमुना तपासणीसाठी मथुरेतील प्रयोगशाळेत पाठवला होता. एप्रिलमध्ये प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात हे मांस कोणत्याही सामान्य प्राण्याचे नसून गोमांस असल्याचे स्पष्ट झाले.
२. पोलिसांच्या अन्वेषणात हे समोर आले की, हे प्रतिबंधित मांस खुर्जा येथील ‘अल् हम्द मीट फॅक्टरी’मधून पुरवले गेले होते. या फॅक्टरीचा मालक माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाऊ अन्वर हुसेन आहे. चंडौस पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आधी १८ जूनच्या संध्याकाळी अन्वरचा नोकर इस्लाम खान याला अटक केली. यानंतर अन्वर याला अटक केली.
३. अन्वर हुसेन याचे भाऊ सरवर हुसेन वर्ष १९८९ मध्ये बुलंदशहरामधून खासदार म्हणून निवडून आले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये ते केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्रीही होते.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक